अकोट: यशोदा नगर येथिल श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी याग पार पडला
Akot, Akola | Nov 30, 2025 अकोट (प्रतिनिधी) स्थानिक यशोदा नगर स्थित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी उत्साहाचे औचित्य साधून अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत 30 नोव्हेंबर ला श्री स्वामी याग संपन्न झाला. या अखंड नामजप यज्ञ सप्ताहा मध्ये 450 महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी श्री गुरुचरित्र वाचनामध्ये बहुसंख्येने सहभाग घेतला आहे.