हिंगणघाट: तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या सदस्यपदाचे आरक्षण जाहीर:कुठे महिला तर कुठे पुरुषांची लागली वर्णी
हिंगणघाट तहसीलदार कार्यालयात आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीच्या बैठकीचे आयोजन उपविभाग अधिकारी आकाश अवतरे, तहसीलदार योगेश शिंदे, नायब तहसीलदार सागर कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.यावेळी पंचायत समितीच्या १४ हि जागाची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.