मेहकर आगाराच्या वाहतूक निरीक्षकांच्या विरोधात तक्रारींचा ढिगार बुलढाणा विभागातील मेहकर आगारामध्ये अनुकंपा च्या माध्यमातून नव्यानेच रुजू झालेले वाहतूक निरीक्षक अतुल सोनावणे यांच्या स्वभावातील हेकेखोर व आरेराविपणाला मेहकर आगारातील कर्मचारी त्रस्त झाले असून एका महिन्यामध्येच अनेक कर्मचाऱ्यांनी तोंडी तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या तर बऱ्याच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात लेखी तक्रारी सुद्धा वरिष्ठांकडे केल्या असून वाहतूक निरीक्षक अतुल सोनावणे यांना राज्य परिवहन च्या सेवेतून निलंबित आणि बडतर्फ करण्याची मागणी सुद्धा लेखी तक्रारीत कर्मचाऱ्यांनी केलेली आहे.