महाबळेश्वर: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर निर्वाळा
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा ठाम निर्वाळा उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी चार वाजता महाबळेश्वरमध्ये दिला. माझ्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असून ती थांबवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथील पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजीतसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.