महाड: आदिवासी भगिनींकडून मंत्री भरत गोगावले यांना भाऊबीजेची ओवाळणी...@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 23, 2025 भाऊबीजेच्या सणानिमित्ताने आज मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी मंत्री भरत गोगावले यांना ओवाळणी केली. पारंपरिक रितीरिवाजानुसार करण्यात आलेल्या या ओवाळणी कार्यक्रमात भगिनींनी आपल्या हातांनी मंत्री गोगावले यांना तिलक लावून आरती करून ओवाळणी केली.या वेळी आदिवासी भगिनींनी परतबागेतील केळी आणि विविध भेटवस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली. मंत्री भरत गोगावले यांनीही या भगिनींच्या प्रेमळ भावनेचा सन्मान करत त्यांच्या सुखसमृद्धीची शुभेच्छा दिल्या..