पुसद: जि. प. व पं. स. आरक्षण सोडतीसाठी 13 ऑक्टोबरला सभा
Pusad, Yavatmal | Oct 10, 2025 जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षण सोडतीसाठी 13 ऑक्टोबरला सभा संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम 2025 नुसार जि. प. व पं. स. क्षेत्रात सभा घेऊन जागा निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी ही सोडत विशेष सभा होईल. याबाबतचे प्रकटन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निर्गमित केले आहे.