चिखली: बॅटरी चोरट्यास अंढेरा पोलिसांनी केली दिग्रस येथून अटक
अंढेरा पोलीस स्टेशनला दिग्रस येथील प्रल्हाद मांटे आणि अनंता मांटे यांनी दिली होती या तक्रारीची दखल घेत तपास केला व आरोपीला अटक केली.तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद मांटे आणि अनंता मांटे यांच्या ट्रॅक्टरमधील दोन बॅटरी तसेच मनीष वाघ यांच्या टिप्परमधील एक बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे, १९ सप्टेंबर रोजी गणेश भिकाजी हुसे (रा. डिग्रस, ता. देऊळगाव राजा) यास चोरीस गेलेल्या बॅटरींसह पकडले. पंचासमक्ष तपासात तीनही बॅटरी जप्त करून त्याला अटक करण्यात आली.