राहुरी: घोरपडवाडी घाटात व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून 70 हजार लुटले
मोटरसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन भामट्यांनी एका कापड व्यापाऱ्याला घोरपडवाडी घाटात अडवुन त्यांना चाकूचा धाक दाखवला. नंतर त्यांच्या जवळील ७० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले आणि पसार झाले. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.