यवतमाळ: भोजला येथे दोन गटात तुंबळ हाणामारी ; 13 जणांवर गुन्हे दाखल
पुसद तालुक्यातील वसंत नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोजला येथे दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन काहीजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसंत नगर पोलीस ठाणे मध्ये परस्परविरोधीच्या तक्रारीवरून 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची पोलीस सूत्रांकडून 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्राप्त झाली आहे.