बुलढाणा: नळगंगा धरणाचे 3 दरवाजे उघडले,627 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणाचे 3 दरवाजे आज 26 ऑक्टोबर रोजी दुपारी उघडण्यात आले आहे. कालपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस कोसळत असल्याने नदी नाले वाहू लागले आहे.मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण अगोदरच शंभर टक्के भरलेला आहे अशात अवकाळी पावसामुळे येवा वाढल्याने धरण प्रशासनाने सतर्कता म्हणून 3 दरवाजे 3 इंचाने उघडले असून 627 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.