दिग्रस आगाराची आदिलाबादहून दिग्रसकडे येणारी एसटी बस (क्र. एमएच-४० वाय-५३४२) मध्ये बसविण्यात आलेला फास्टॅग काम करत नसल्याने दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी टोलनाक्यावर बस अडकली. ही घटना आज शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. फास्टॅगमधील तांत्रिक बिघाडामुळे टोलनाक्यावर बस थांबवावी लागल्याने प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.