आजच्या गढूळ सामाजिक वातावरणात अठरापगड जाती-पातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सेतू उभारणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे अरविंद देशमुख, असे गौरवोद्गार आमदार अर्जुनराव खोतकर यांनी काढले. अशा सर्वसमावेशक नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन रविवार दि.19 ऑक्टोबर 2025 रोजी दु.2 वजाता त्यांनी केले.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विभागीय सरचिटणीसपदी अरविंद बाळासाहेब देशमुख यांची निवड झाली.