बाभूळगाव: गणोरी येथे शुल्लक कारणातून एकाची हत्या,आरोपी विरुद्ध बाबुळगाव पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी भानुदास शंकरराव माकोडे यांच्या तक्रारीनुसार 17 ऑक्टोबरला रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास आरोपी भारत वामनराव ठाकरे याने रामदास शंकरराव माकोडे यांना तू माझ्या सासुरवाडीमध्ये माझी बदनामी का करतो असे म्हणून रामदास माकोडे यांना लाकडी लाफ्टरने पाच सहा वेळा डोक्यावर मारून गंभीर जखमी करून जिवानिशी ठार मारले. याप्रकरणी 18 ऑक्टोबरला अंदाजे दीड वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात दिलेल्या तकरीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.