दिग्रस नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११-अ मधून रिक्षा चालवून रोजमजुरी करणारा बिलाल मिरावाले नगरसेवक झाला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या बिलाल यांनी तिरंगी लढतीत दोन्ही शिवसेनांच्या उमेदवारांचा ४७ मतांनी पराभव करत जनतेचा विश्वास संपादन केला. पैसा, सत्ता आणि राजकीय पाठबळ नसतानाही त्यांनी मिळवलेला हा विजय धनशक्तीवर जनशक्तीचा मोठा संदेश देणारा ठरला आहे. विजयानंतर आज दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जनतेचे आभार मानले.