तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोंदी पोलिसांनी गणेश कैलास मरकड (वय 26, रा. गोंदी ता. अंबड) याच्यावर कारवाई केली आहे. मरकड यास माननीय पोलीस अधीक्षक जालना यांच्या आदेशाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55/1 अन्वये एक वर्षासाठी जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास गोंदी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना मरकड हा विनानंबर लाल रंगाच्या स्वराज 744 XT ट्रॅक्टर–ट्रॉलीसह भाग्यनगरच्या दिशेने जाताना आढळून आला. पोलिसांनी थांबवण्याचा इश