रामटेक: राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी नगरधनची कुस्तीपटू कु. यशस्वी ईश्वर मेश्राम ची निवड
Ramtek, Nagpur | Oct 30, 2025 हिमाचल प्रदेश येथील कसौली येथे सीबीएससी राष्ट्रीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2025 आयोजित स्पर्धेत गुरुवार दि.30 ऑक्टोबरला सायं. चार वाजता च्या दरम्यान कुस्ती स्पर्धेत रामटेक तालुक्यातील नगरधन येथील कु. यशस्वी ईश्वर मेश्राम या कुस्तीपटूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र होण्याचा गौरव प्राप्त केला आहे. सदर स्पर्धेमध्ये नागपूर विभागातून 14 वर्षाखालील मुलींच्या गटात यशस्वी ईश्वर मेश्राम नगरधन हिने 54 किंग्रा वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला.