धुळे: तालुक्यातील बोरकुंड येथे 38 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
Dhule, Dhule | Nov 5, 2025 धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात 38 वर्षीय गोविंद माळी यांनी 4 नोव्हेंबर रोजी पहाटे आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी घरातील सदस्यांना ही घटना लक्षात आली असून, त्यांना तत्काळ धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.