सर्वसामान्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि त्यांना विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा, या उदात्त हेतूने लाखनी येथील समर्थ मैदानात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित भव्य 'महामेळाव्या'चा शुभारंभ करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.