शिरपूर: दोन गावठी पिस्तुलं,11 जिवंत काडतुसेसह दरोडेखोरांची टोळी जेरबंद,सुळे फाट्यावर तालुका पोलिसांची कारवाई
Shirpur, Dhule | Oct 12, 2025 मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील सुळे फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली एका गुन्हेगारांची टोळीवर ११ ऑक्टोबर २०२५ रात्री साडे ११ रोजी वाजेच्या सुमारास कारवाई करीत दोन गावठी पिस्तुले,११ जिवंत काडतुसे आणि एक टाटा टियागो कार असा ३ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास पीएसआय मिलींद पाटील करीत आहे.