खंडाळा: पुण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी खंडाळा जवळ अवजड वाहने अडवली; चालकांचा तीव्र संताप
पुण्यामध्ये वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना खंडाळा जवळ सेवा रस्त्यावर अडवण्यात आले. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत एकाच ठिकाणी थांबविल्याने जवळपास चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.जवळपास चार तासाहून अधिक काळ एकाच जागी वाहने थांबवल्यामुळे अवजड वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने वेळेवर डिलिव्हरी करता येत नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे चालकांनी सांगिले.