चामोर्शी: हत्तीच्या हल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची, आमदार नरोटेकडून पाहणी व मदतीचे निर्देश
गडचिरोली: २२ सप्टेंबर २०२५ रोजी पिपरटोला आणि दिभना गावांमध्ये हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतीत झालेल्या नुकसानीची पाहणी भाजप आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आमदार नरोटे यांनी कृषी, महसूल, तहसील आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल