साकोली: मालूटोला येथे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी साकोली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले निवेदन
साकोली तालुक्यातील मालूटोला/पुजारीटोला येथील शेतशिवारात जंगली प्राण्यांनी हैदोस घातला असून त्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे नुकसानीची भरपाई द्यावी व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन मालूटोला येथील शेतकऱ्यांनी साकोली येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बुधवार दिनांक 17 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता दिले आहे.वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी शेतकरी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते