धरणगाव: लासलगाव येथील दलित तरुणाच्या हत्येचा धरणगावात निषेध; समाज बांधवांनी दिले धरणगाव तहसीलदारांना निवेदन
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे एका दलित तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ, धरणगाव येथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समाजाच्या वतीने तहसीलदारांना शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.