रिसोड: सखाराम महाराज विद्यालयाचे विद्यार्थी शालेय क्रिडा स्पर्धेत राज्यस्तारावर
Risod, Washim | Nov 1, 2025 महाराष्ट्र शासन अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील लोणी बु. येथील श्री सखाराम महाराज विद्यालयातील 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थी यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत विजय मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झाल्याची माहिती दि. 01 नोव्हेंबर रोजी देण्यात आली.