जालना शहरातील संजय नगर परिसरात तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून तीन धारदार व तीक्ष्ण तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. गुरुवार दि. 12 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता स्थानिक गुन्हे शाखेकडून ही माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने कारवाई केली. अनिल किशोर मोरे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे.