हिंगणा: वानाडोंगरी न.प.त भाजपाचे नगरसेवक आबा काळे अविरोध विजय
Hingna, Nagpur | Nov 22, 2025 वानाडोंगरी नगरपरिषदेमधून नगरसेवक पदाकरिता भाजपाला पहिला विजय मिळाला आहे. येथील प्रभाग क्रमांक १२ 'ब' (सर्वसाधारण) मधून नितीन (आबा) काळे हे नगरसेवकपदाकरिता अविरोध विजयी झाले आहेत. या प्रभागातून त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिनेश भुसारी यांनी आश्चर्यकारकरीत्या उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काळे यांच्याविरोधात एकही उमेदवार रिंगणात उरला नाही.