अमळनेर: दहीवद गावठाण जागेतून गुरांची चोरी; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील दहीवद गावातील गावठाण जागेत चार शेतकऱ्यांच्या मालकीच्या बांधलेल्या गुरांची चोरी केल्याची घटना रविवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.