कोरपणा गोंडपिपरी परिसरात वाघाने धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून काल अलका बेंदूर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आज 27 ऑक्टोबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजता पासून तणावपूर्ण अहेरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल नऊ तास रोखून धरला दरम्यान पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची आणि शेवटच्या क्षणी वन विभागाने दाखविलेली तत्परतेनंतर आंदोलन मागे घेतले