देगलूर: शहरातील नवीन पाण्याच्या टॉकीजवळ असणाऱ्या अंबिका ऑइल मिलच्या मागे देशी दारूच्या दुकानात दिवसाढवळ्या एकाचा खून,आरोपी अटकेत
Deglur, Nanded | Nov 9, 2025 देगलूर शहरातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ अंबिका ऑइल मिलच्या पाठीमागे असणाऱ्या देशी दारूच्या दुकानामध्ये धारदार शस्त्राने मानेवर वार करत शेख निसार बाबुमिया वय 30 वर्ष याचा शेख शादूल शेख सलीम वय 45 याने खून केला असून ही घटना आजरोजी सकाळी 10 :30 ते 11 च्या सुमारास घडली आहे, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी पोलीस निरीक्षक मुंडे तसेच पोलिस कर्मचारी यांनी धाव घेतली होती. घटना घडताच देशी दारूच्या व्यवस्थापकाने आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन केले असून, सदर घटनेस पूर्व वैमनस्य असू शकते