लगतच्या ग्राम नंगपुरा मुर्री येथील ममता कैलाश कामरकर (३८) या महिलेच्या घरावर शनिवारी (दि.३) दुपारी २ वाजता स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार महेश मेहर, शिपाई इंदुरकर व तोंडरे यांनी धाड घालून बाथरूमजवळील दोन प्लास्टिक बॉटल्समध्ये ठेवलेली मोहफुलाची पाच लिटर दारू जप्त केली. जप्त दारूची एकूण किंमत एक हजार रुपये आहे. आरोपीविरुद्ध शहर पाेलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे