कोपरगाव: येसगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश, वनविभागाची माहिती
कोपरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाले असल्याची माहिती आज ११ नोव्हेंबर रोजी सकाळी वन विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. येसगाव शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात 60 वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते.