चामोर्शी: चामोर्शीच्या क्रिश छोडरेचे कराटेमध्ये यश, जिल्हास्तरासाठी निवड .
गडचिरोली :चामोर्शी,यशोधरा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे शिकणारा सातवीचा विद्यार्थी क्रिश संजय धोडरे याने तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अंडर-14 वयोगटातील 45 किलो वजन गटात त्याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राहुल लोक विकास मंडळाचे अध्यक्ष कौशल्या सहारे, सचिव विवेक सहारे, कोषाध्यक्ष वक्टुजी उंदिरवाडे, तसेच शाळेचे प्राचार्य शाम रामटेके, शिक्षक आणि प्राध्यापका