साक्री: साक्री तालुक्यात सुधारित आनेवारी लागू करण्यात यावी यासाठी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन
Sakri, Dhule | Nov 25, 2025 साक्री तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने अंतिम आणेवारी जाहीर करतांना पुनर्विचार करावा या मागणीसाठी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे कपाशी मका कांदा पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.अतिशय कमी प्रमाणात उत्पादन झाले आहे.रासायनिक खते,बी बियाणे यांच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यावर आधीच कर्जाचा बोजा वाढून बसला