शिंदोला माइंस येथील एससी (अदानी) सिमेंट कंपनीच्या मालवाहतूक वाहनांमुळे उडणाऱ्या प्रचंड डस्टमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शिंदोला परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख (वाहतूक आघाडी) धनराज सूर्यभानजी भलने यांच्या वतीने तहसीलदार वणी व कंपनी व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.