कोपरगाव: बालाजी अंगण परिसरात चोरट्यांचा देशी दारू डल्ला;उभ्या ट्रकमधील 65 बॉक्स लंपास, गुन्हा दाखल
कोपरगाव शहरातील बालाजी अंगण जवळ उभ्या असलेल्या मालवाहक ट्रकमधून तब्बल ६५ बॉक्समधील ३ हजार पेक्षा अधिक सीलबंद देशी दारूच्या बाटल्यांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद असून, या घटनेमुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत आज १० ऑक्टोबर रोजी शहर पोलिसांनी माहिती दिली आहे.