गोंडपिंपरी: सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याच्या उपचारादरम्यान चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील शेतमजूर आशाराम लिंगा मोहुर्ले (५६) यांचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुडेसावली येथील देवराव सुरु यांचे शेतात मजुरीने गेले असता त्यांना सापाने दंश केल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस उपचार झाले पण त्यांची प्राणज्योत मालवली.