यावल: यावल येथे जळगावच्या तरुणाच्या खून प्रकरणी अटकेत संशयतांना न्यायालयीन कोठडी, नंदुरबार कारागृहात हलवले
Yawal, Jalgaon | Dec 12, 2025 यावल शहरातील बोरावल रस्त्यावर तरुणाला जवळ मारहाण करण्यात आली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हा या खून प्रकरणी पाच संशयीतांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्व संशयतांना ९ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते त्यानंतर शुक्रवारी त्यांना भुसावळ येथील विशेष न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे व त्यांची रवानगी नंदुरबार कारागृहात करण्यात आली आहे.