सततच्या पारंपरिक पिकांच्या चक्रातून बाहेर पडत भंडारा तालुक्यातील माथाडी येथील गणेश शेंडे या युवा शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरली आहे. त्यांनी आपल्या दोन एकर शेतीत पपईची यशस्वी लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या प्रयोगासाठी त्यांना सुमारे २ लाख रुपयांचा खर्च आला असून, पपईच्या दर्जेदार उत्पादनातून त्यांना ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची दाट शक्यता आहे.