पशुसंवर्धन विभाग च्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी दिपप्रजलक म्हणून उपसभापती रामेश्वर महारवाडे उपस्थित होते.शेतकऱ्यांना आधुनिक पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशु आरोग्य व शाश्वत शेती विषयक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, अशा उपक्रमातून शेतकऱ्यांची उत्पन्न वाढीस लावून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असे मनोगत उपसभापती रामेश्वर महारवाडे यांनी व्यक्त केले