उमरेड: साले भट्टी येथील मच्छी तलावाजवळ जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध बेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Sep 14, 2025 13 सप्टेंबर रोजी बेला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साले भट्टी येथे सुरू असल्याने जुगारावर छापा मार कार्यवाही करून सहा दुचाकी व इतर साहित्य असा एकूण तीन लाख 90 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी नितेश चुटे, राहुल लाडे, भोजराज मेहेर व पोलिसांना पाहून फरार झालेल्या तीन आरोपी विरोधात बेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे