जालना तालुक्यातील मानेगाव खालसा येथील आनंद बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आदरपूर्वक साजरा करण्यात आला. रविवार दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून महावंदना आणि परित्राण पाठ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रध्दांजली अर्पण केली. या प्रसंगी गावातील मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.