मोहाडी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात सार्व. वाचनालय असून या वाचनालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शेकडो विद्यार्थी येतात. मात्र न.पं.चे घनकचरा कर्मचारी त्या ठिकाणी घंटागाडी धुणे व इतर वाहने धुणे तसेच त्या ठिकाणी कचरा व घाण टाकत असल्याने या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर समस्येवर न.पं.चे दुर्लक्ष असल्याने वाचनालयातील विद्यार्थ्यांनी न.पं.प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला असून हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.