समुद्रपूर: शहरातील आठवडी बाजार परीसात ठेवून असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली
समुद्रपुर शहरातील आठवडी बाजार परीसरात ठेवून असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार मनोज शेंडे राहणार पाईकमारी यांनी समुद्रपुर पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार मनोज शेंडे यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच ३२ ए.बी २३६७ हि आठवडी बाजार परीसरात उभी ठेवून ते भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते भाजीपाला घेऊन आले असता त्यांना ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी दिसली नाही आजुबाजूला शोध घेतला मात्र दुचाकी कुठेही मिळून आली नाही.