हिंगणघाट: शहरातील सर्वांगीण विकास व सांस्कृतिक वैभवाच्या सुवर्ण आरंभाला उपस्थित राहवे: आमदार समिरभाऊ कुणावार यांचे आव्हान
हिंगणघाट शहरासाठी गौरवाचा क्षण म्हणजे उपजिल्हा रूग्णालय मागील शासकीय जागेवर भव्य सांस्कृतिक सभागृह (नाट्यगृह) ₹१७ कोटी निधीचा तसेच बस स्थानक पुनर्बांधणी रुपये ५ कोटी निधीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम या दोन्ही ऐतिहासिक प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या शहरातील सर्वांगीण विकास व सांस्कृतिक वैभवाचा सुवर्ण आरंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी केले आहे.