श्रीगोंदा: पारगाव सुद्रिक येथे आमदार विक्रम पाचपुते यांची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
पारगाव सुद्रिक येथे आमदार विक्रम पाचपुते यांची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी श्रीगोंदा–नगर विधानसभा मतदारसंघातील पारगाव सुद्रिक परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपारी एक वाजता आमदार विक्रम पाचपुते यांनी बाधित भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. आमदार पाचपुते यांनी शेतात जाऊन पिकांची झालेली हानी पाहिली व या कठीण प्रसंगी शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.