गोंदिया: खोट्या कागदपत्रावर जमीन हडपण्याचा प्रयत्न राहुलकर कुटुंबीयांच्या आरोप तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचे संशयास्पद भूमिका
खोट्या कागदपत्रांच्या आधारावर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा प्रकार फुलचूटोला ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या सेलटेक्स कॉलनी येथे घडला आहे तशी माहिती मनोरमा राहुलकर यांनी आज दि. ७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली मनोरमा राहुलकर म्हणाल्या की माझ्या पतीच्या नावे आणि माझ्या ननंदच्या नावे सेलटॅक्स कॉलनी येथे एक एकर जमीन भूमापन क्रमांक व उपविभाग 93/1 आहे या जमिनीच्या सातबारावर आमच्या कुटुंबातील सहा लोकांची नावे आहेत ज्यामध्ये आम्ही कोणताही फेरफार केलेला नाही