नेवासा: शाळेबाहेर फिरणाऱ्या टारगट मुलांचा बंदोबस्त करावा.
नेवासा शहरातील विद्यालयाच्या बाहेर फिरणाऱ्या टारगट मुलांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली आहे. विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळा बाह्य टारगट मुलांकडून दमबाजी करणे, मारहाण करणे, हातवारे करणे या सारखे प्रकार रोजच विद्यालयाच्या परिसरात घडत असतात.