हिंगणघाट: जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्या ट्रक मधुन
१४ जनावरांची सुखरुप सुटका:शहरातील सरकारी दवाखाना चौकात कारवाई
हिंगणघाट शहरातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील सरकारी दवाखाना चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या वर्धा पथकाने जनावरांची निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या ट्रक मधुन १४ जनावरांची सुखरुप सुटका करीत एकुण २१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. संपुर्ण १४ गोवंश जनावरांची सुखरूप सुटका करुन त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने व चारा पाण्याची व्यवस्था करीता गोरंक्षण संस्थे मध्ये ठेण्यात आलेले आहे.