राहुरी: दिवंगत आ. शिवाजीराव कर्डिलेंना वळणमधे सर्वपक्षीय श्रद्धांजली
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे दुःखद निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कर्डिले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आज बुधवारी सकाळी वळण येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होते. यामध्ये विविध मान्यवरांनी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेस अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली.