साकोली: खैरी वलमाझरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन
खैरी वलमाझरी येथील ग्राम संसदेमध्ये बुधवार दि.17 सप्टेंबरला सकाळी11 ते दुपारी2या वेळात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेला विस्तार अधिकारी ललित कुंभरे तसेच पंचायत समितीचे जनार्दन डोरले,निरंजन गणवीर,गौतम बोरकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांच्या मार्गदर्शनात खैरी वलमाझरीची राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेसाठी तयारी केली जात आहे.याकरिता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे